spot_img
spot_img
spot_img

सिंबायोसिस स्किल्स अ‍ॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी (NDA) यांच्यात सामंजस्य करार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सिंबायोसिस स्किल्स अ‍ॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) आणि नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी (NDA) यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) झाला आहे. या करारामार्फत वैद्यकीय किंवा अन्य कारणांमुळे बोर्ड आऊट झालेल्या एनडीए कॅडेटसाठी उच्च शिक्षणाचा नवा मार्ग खुला करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. स्वाती मुजुमदार, प्रो. चॅन्सलर, सिंबायोसिस स्किल्स अ‍ॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांनी दिली.

या उपक्रमामुळे पात्र कॅडेटना बी.टेक. आणि बीबीए समकक्ष अभ्यासक्रमांमध्ये थेट प्रवेश मिळणार असून, यात नुकतेच सुरू करण्यात आलेला ‘बी.टेक. इन डिफेन्स टेक्नॉलॉजी’ हे अभ्यासक्रम देखील समाविष्ट आहे. जे विद्यार्थी पात्रतेची अट पूर्ण करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी ब्रिज कोर्सेस देण्यात येणार आहेत, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचा संघर्ष, प्रयत्न आणि महत्वाचे वर्ष वाया जाऊ नयेत या करीत हा प्रयत्न केला जात आहे. प्रा. डॉ. ओ. पी. शुक्ला, जीपी कॅप्टन रमणी, डॉ. प्रज्ञा बाजपेयी, स्क्वाड्रन लीडर कृष्णा, मेज. सुमित ओझा हे मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या भागीदारी मुळे विद्यार्थ्यांनमध्ये प्रोत्साहन टिकून राहील आणि करिअर मध्ये सतत पुढे जाण्याच्या प्रयत्नाला मदत मिळेल. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी देणे हीच या उपक्रमा मागची प्रेरणा आहे. जीवनामध्ये करिअरचा ग्राफ उंचावण्यासाठी हि एक चांगली संधी असणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!