सोमाटणे ग्रामपंचायत ही पवन मावळतली एक महत्त्वाची अशी ग्रामपंचायत आहे, पवन मावळतील अशा ग्रामपंचायती वर शैलेश मुऱ्हे यांची निवड झाल्याने सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन होत आहे,
मावळत्या उपसरपंच आश्विनी मुऱ्हे यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती शैलेश मुऱ्हे यांच्या उपसरपंचपदी निवड झाल्याचे पत्र निवडणूक अधिकारी गोपीनाथ खोमणे व सरपंच स्वाती कांबळे यांनी दिले
निवड झाल्यानंतर शैलेश मुऱ्हे म्हणाले सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवुन मला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्यानुसार सरकारच्या जास्तीत योजनाचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देईल.
शैलेश मुऱ्हे यांची सोमाटणे ग्रामपंचायतिच्या उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर एकता प्रतिष्ठान डोणे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्या समयी साळुंब्रे गावचे आदर्श मा. सरपंच धनंजयमामा विधाटे एकता प्रतिष्ठाण डोणेचे संस्थापक बाळासाहेब घारे, व त्यांचे सहकारी मित्र अमित वहिले बन्सीभाऊ राक्षे आदी उपस्थित होते