थेरगाव मध्ये मनपा वतीने हुकूमशाही पद्धतीने आरक्षण टाकल्याने अनेकांच्या घरावर आली गदा
थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघ करणार आंदोलन
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने शहर विकास आराखड्यात 24 मीटरचे रस्ते तसेच 12मीटर ,15 मीटर डीपी , 30 मीटर, एच सी एम टी आर रस्ते व इतर आरक्षणे टाकली आहे सदरची आरक्षणे ही हुकूमशाही पद्धतीने टाकण्यात आले असल्याचा आरोप थेरगाव वासियांच्या वतीने करण्यात आला आहे.
थेरगाव मध्ये शंभर टक्के दाट वस्तीवरून 24 मीटर ,बारा मीटर, पंधरा मीटर डीपी व 30 मीटर एच सी एम टी आर रोड च्या विरोधात थेरगाव मधील रहिवासी, सिटी सर्वे नंबर, प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी मोर्चे आंदोलन व गाव बंद करून उपोषण करून थेरगाव मध्ये लाक्षणिक कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय रहिवाशी वतीने घेण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासन व राज्य शासनाने थेरगाव परिसरातील स्थानिक नागरिकांना विचारात न घेता व भौगोलिक परिस्थितीचा सर्वे न करता गुगल मॅप वरून अन्यायकारक हुकूमशाही पद्धतीने आरक्षणे टाकली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी याकरिता हे थेरगाव बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाच्या वतीने देण्यात आली आहे.
30 जून रोजी थेरगाव मधील 16 नंबर बस स्टॉप ते काळेवाडी फाटा ते श्रीनगर पासून गावठाण शिवस्मारक अशी पदयात्रा होणार आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता ही पदयात्रा सुरू होणार असल्याची माहिती थेरगाव वासियांच्या वतीने देण्यात आली आहे.