विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची जादू अजूनही कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता असं दिसून येतंय की, हा चित्रपट पुन्हा एकदा मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. सहाव्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाचा वेग आणखी वाढेल आणि सलमान खानचा सिकंदर रिलीज होण्यापूर्वी हा चित्रपट 600 कोटींचा आकडा गाठू शकतो. चित्रपटाच्या आजच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे SciFi वर आले आहेत. जाणून घेऊयात, आतापर्यंत चित्रपटानं एकूण किती कोटी कमावले?
‘छावा’ आज बॉक्स ऑफिसवर 5 आठवडे पूर्ण करत आहे, तर चित्रपटाची वेगवेगळ्या आठवड्यांतील कमाई सविस्तर जाणून घेऊयात, चित्रपटानं पहिल्या आठवड्यापासून चौथ्या आठवड्यापर्यंत 225.28 कोटी, 186.18 कोटी, 84.94 कोटी आणि 43.98 कोटींची कमाई केली आहे. तर ‘छावा’नं 29व्या, 30 व्या आणि 31व्या दिवशी एकूण 7.25, 7.9 आणि 8 कोटी रुपये कमावले. त्यानंतर 32व्या, 33व्या और 34व्या दिवशी दररोज 6.5 कोटी रुपयांचा व्यवसाय करून, 34 दिवसांत एकूण 583.03 कोटींची कमाई केली आहे.
सॅकनिल्कच्या मते, ‘छावा’नं आज सकाळी 10:15 वाजेपर्यंत 2.35 कोटी रुपये कमावले आहेत, ज्यामुळे एकूण कमाई 585.38 कोटी रुपये झाली आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
खरंतर, मॅडॉक फिल्म्सनं त्यांच्या इन्स्टा हँडलवर पोस्ट केलं आहे की, आज म्हणजेच, शुक्रवारी काही निवडक थिएटरमध्ये ‘छावा’ची तिकिटं फक्त 99 रुपयांना उपलब्ध असतील. ज्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढू शकते. जर या आठवड्याच्या शेवटी चित्रपटानं चांगली कमाई केली, तर तो लवकरच स्त्री 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा 597.99 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो.