spot_img
spot_img
spot_img

मुस्लिम समाजाकडून राहुल डंबाळे यांना मौलाना आझाद समाज भूषण पुरस्कार प्रदान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

देशभरातील अल्पसंख्यांक विशेषता मुस्लिमांच्या प्रश्नावर अत्यंत प्रभावी काम करत असल्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांचा पुणे शहर जिल्हा मुस्लिम समाज च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशीद शेख व माजी नगरसेवक आयुब शेख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक गफूर पाटण, माजी नगरसेवक रईस आबीद शेख, सुंडके, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष हाजी फिरोज शेख, माजी नगरसेविका हिमाली कांबळे, माजी नगरसेवक अविनाश साळवे, बाळासाहेब जानराव, बापूसाहेब भोसले, ज्येष्ठ उद्योजक नजीर तांबोळी, अॅड. अय्युब शेख , माजी नगरसेवक अनिस अनिस सुंडके,  शैंलेद्र चव्हाण , महेंद्र कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, दलित पॅंथरचे यशवंत नडगम, मौलाना हाशमी, सिध्दीक शेख , शहाबुद्दीन शेख ॲड. भाई विवेक चव्हाण ,  मिलिंद आहिरे ,अतुल साळवे , डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, शहाबुद्दीन शेख , सलिम पटेल ,असिफ खान , सिकंदर मुलाणी   आदि  मान्यवर उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमाचे आयोजन जावेद भाई शेख, सलीम पटेल, आसिफ शेख, मुज्जमिल शेख व मिनाज मेमन यांनी केले होते. ढोले पाटील रोड येथील आहार बँक्वेट  हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राहुल डंबाळे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच देशातील धर्मनिरपेक्षता अद्याप टिकून आहे आणि हिंदू मुस्लिम सलोखा कायम आहे असे स्पष्ट मत रशीद शेख यांनी मांडले.  तर धार्मिक ध्रुवीकरणाला कोणत्याही प्रकारे थारा न देता मुस्लिम व अल्पसंख्यांकांची प्रश्न अत्यंत ताकतीन प्रशासनासमोर मांडून त्यांची सोडवणूक करण्याचा यशस्वी प्रयत्न राहुल डंबाळे हे देशभर करत असल्याची बाब वाखण्याजोगी आहे असे मत आयुब यांनी मांडले. 

शहरातील सामाजिक सोलोखा टिकवण्यामध्ये राहुल डंबाळे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मांडले आंबेडकरी विचारांच्या संस्कारामुळेच संविधानातील अल्पसंख्याकांच्या व धर्मनिरपेक्ष तरतुदींची अंमलबजावणी करण्यात कायम आग्रही भूमिका राहुल डांबाळे  यांनी घेतली असून आज मुस्लिम समाजाकडून त्यांना देण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याची मोठी पावती असल्याचे मत परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केले. 

जात धर्म भाषा पंथ या सर्वांच्या वर भारताची संस्कृती व भारताचे संविधान आहे त्यामुळे संविधानातील भारत निर्मिती करण्यासाठी आपण सर्वांनीच एकमेकांना साहाय्य करण्याची आवश्यकता असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!