spot_img
spot_img
spot_img

रस्ता बाधित करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सूचना व हरकती नोंदवाव्यात – मारुती भापकर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोहननगर, रामनगर, काळभोरनगर मधील रस्ता बाधित करण्यासाठी नागरिकांनी व्यक्तिगत जास्तीत जास्त सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी नागरिकांना केले आहे.

ते म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रारूप विकास आराखडा (डिपी) जाहीर केला असून यामध्ये विविध रस्ते व विविध आरक्षणाबाबत नागरी वस्तीतील अनेक घरे,दुकाने भविष्यात बाधित होणार आहेत. या विकास आराखड्याबाबत सूचना व हरकती घेण्याची मुदत ६० दिवसाची असून ती १८ जुलै २०२५ पर्यंत आहे. या सूचना व हरकतीबाबत मोहननगर,रामनगर, काळभोरनगर, महात्मा फुलेनगर ,दत्तनगर, विद्यानगर, परशुरामनगर या भागात हरकतीच्या मसुदा फार्म वाटप करण्यात आला होता. तो नीट वाचून त्यात काही बदल करायचा असेल तर तो करून प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने व्यक्तिगत या हरकतीवर स्वाक्षरी करून आप आपली हरकत नोंदवावी अशी विनंती आम्ही केली होती.

आपल्या दोन बैठकांमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे आज सोमवार दि.२३/६/२०२५ रोजी सकाळी११.३० वा.पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात मोहननगर रामनगर, दत्तनगर, कळभोरनगरचे नागरिक एकत्रित येत मोठ्या संख्येने व्यक्तिगत सूचना व हरकती नोंदवल्या आहेत. यामध्ये मा. नगरसेवक मारुती भापकर, राजू दुर्गे, प्रसाद शेट्टी, महादेव नेरलेकर दत्ता देवतरासे, सोमनाथ अलंकार बापूसाहेब हाके, प्रसाद दौंडकर राजू पाटील सलीम शेख,रोप शेख, श्रीजीत पिल्ले ह भ प डोके महाराज, वलवणकर काका, सावंत मामा, लोणकर वहिनी, आदि प्रमुख कार्यकर्ते व नागरिक महापालिका मुख्यालयात उपस्थित होते.

अजूनही मोहननगर रामनगर काळभोरनगर मधील अनेक लोकांनी सूचना व हरकती नोंदवलेल्या नाहीत. तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सूचना व हरकती महापालिका मुख्यालयात जाऊन नोंदवाव्यात , असे भापकर यांनी म्हंटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!