spot_img
spot_img
spot_img

परिणीता पत्री यांचा ध्यान साधनेचा कार्यक्रम, केवळ 35 वर्षाखालील व्यक्तींसाठी 28 जून रोजी चिंचवड मध्ये

शबनम न्यूज , प्रतिनिधी :
आजच्या धावपळीच्या जीवनात तरुणाईला ध्यान साधनेची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. ध्यान साधनेमुळे जीवनात अनेक परिवर्तन घडत असतात, निरोगी आरोग्यासाठी तसेच आनंदी मनासाठी ध्यान साधना अत्यंत आवश्यक असते आणि त्याचाच फायदा तरुणाईला मिळावा यासाठी शनिवार दिनांक 28 जून रोजी ब्रह्मऋषी पितामह पत्रीजी यांच्या मोठ्या कन्या परिणीता पत्री यांचा ध्यान साधनेचा कार्यक्रम संपन्न होत आहे.

केवळ 35 वर्षाखालील व्यक्तींसाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून “तुम्ही शांतता शोधा, तुमचे लक्ष केंद्रित करा”, “तुमची खरी क्षमता उघड करा” असा संदेश देत सर्व तरुण वर्गांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे .”एका परिवर्तनकारी आंतरिक प्रवासाला सुरुवात करा” अशी हाक देत हा कार्यक्रम शनिवार दिनांक 28 जून रोजी, सकाळी दहा ते पाच या कालावधीत पिंपरी चिंचवड शहरात कल्याण प्रतिष्ठान, केशवनगर, चिंचवड येथे संपन्न होत आहे.यामध्ये spiritual science, music meditation, pyramid power, vegetarianism, sajjana sanghatya अशा विविध ध्यान साधनेचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आला आहे ज्याचा फायदा अनेक तरुणांना होईल.


हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून या ध्यान साधनेच्या कार्यक्रमात तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!