शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाच्या कु. डिंपल उडाणशीवे, अंजली पौळ, नंदिनी साधू यांनी पिंपरी चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व करत पहिल्या १८ वर्षाखालील महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक१४/६/२०२५ ते१८/६/२०२५ दरम्यान श्री आदित्य उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत रौप्य पदक मिळविल्याबद्दल खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
मनोज लोणकर, सह आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांचे शुभहस्ते व , किशोर ननवरे प्रभाग अधिकारी, नितीन निंबाळकर कार्यकारी अभियंता स्थापत्य , जाहिर मोमीन कार्यकारी अभियंता जलनिस्सारण यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सदर खेळाडूंना श्रीरंग उर्फ आप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा,पंकज पाटील उपायुक्त क्रीडा, रंगराव कारंडे क्रीडा अधिकारी, ग्यानचंद भाट प्रशासनाधिकारी क्रीडा यांचे सहकार्य तर बन्सी आटवे व सोनाली जाधव यांची प्रशिक्षण लाभले आहे.