शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षणतज्ञ डॅा श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी मा. नगरसेवक सुरेश भोईर यांच्या कार्यालय चिंचवड येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन श्रद्धेय डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले.
या वेळी मा नगरसेवक सुरेश भोईर भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे,उपाद्यक्ष रवींद्र देशपांडे,सचिव मधुकर बच्चे रवींद्र प्रभुणे, पल्लवी पाठक,दीपाली कालापुरे,पंजाबराव मोंढे,सुरभी उमदी,वैशाली भागवत, चंद्रकांत भालके,शिवाजी राऊत,मंगलदास खैरनार,शिवाजी देशमुख,शैलेंद्र गावडे,मधुकर कुलकर्णी,शिवाजी गावडे,सीताराम सुबंध,सुभाष पंडित,सर्जेराव कोळी,विजय आराख,हरिभाऊ मोहिते, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.शामाप्रसाद यांनी कलकत्ता विद्यापीठाचे बी. एल्. (१९२४) ही पदवी घेऊन इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास केला व ते बॅरिस्टर झाले (१९२७). लंडनहून परत आल्यावर त्यांनी वकिली सुरू केली. त्यांनी जम्मू व काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी अभियान सुरू केले. या आंदोलनानिमित्त प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करण्याचा त्यांनी निश्चय केला. जम्मू-काश्मीरचे तत्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या शासनाने त्यांच्या राज्यप्रवेशावर बंदी घातली. बंदी मोडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना अटक झाली. तुरुंगवासातच त्यांचा अंत झाला. या प्रश्नावर शेख अब्दुल्ला यांच्याविरुद्ध त्यावेळी बरेच काहूर माजले होते.
“एक देश मे दो प्रधान, दो विधान, दो निशान नही चलेंगे”
असा नारा देऊन भारताच्या अखंडतेसाठी लढा देणारे, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथी निमित्त आपण सर्वांनी विनम्र अभिवादन करणे आपले कर्तव्यच आहे असे भाजपा उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे यांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या. या वेळी परिसरातील विविध मान्यवर व नागरिक यांनीही आपल्या वेळेनुसार येऊन डॉ.शामाप्रसाद पुष्प वाहून यांना अभिवादन केले.