spot_img
spot_img
spot_img

विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासा बरोबरच कला, खेळात प्राविण्य मिळवावे ; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे मत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती 10 वी, 12 वी मध्ये त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे होते. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी गुण जास्त कक्षात मिळाले आहेत यापेक्षा आपल्याला चांगले काय समजते, कक्षात अधिक रुचि आहे अशा विषयांची निवड करिअर म्हणून केले तर अधिक चांगले यश मिळते.  विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासा बरोबरच एक कला, एखाद्या खेळात प्राविण्य मिळवावे असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुण्याच्या माजी उपमहापौर  सुनिता परशुराम वाडेकर आणि मित्र परिवार यांच्या वतीने इयत्ता १० वी आणि १२ वी शालांत परीक्षेत नाविन्यपूर्ण यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणी करिअर मार्गदर्शन सम्यक विहार व विकास केंद्र बोपोडी या ठिकाणी पार पडले.यावेळी आमदार शिरोळे बोलत होते.

या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर,माजी अपर जिल्हाधिकारी शरद जाधव,रोटरी क्लब ऑफ पुना डाऊन टाउन चे अध्यक्ष प्रा.पी.एन.अय्यर, रोटरी क्लब ऑफ पुना डाऊन टाउनच्या वैद्यकीय संचालक डॉ. झिमरा इस्रायल, रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक किरण लोखंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराचे अध्यक्ष संजय सोनवणे, आयोजक माजी उपमहापौर सुनिता वाडेकर आदि मान्यवर उपस्थित होते. 

या प्रसंगी प्रा.पी.एन.अय्यर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना करिअर मार्गदर्शन केले. डॉ. झिमरा इस्रायल यांनी मुलींनी यशस्वी होण्यासाठी घर आणि करिअर यांचा मध्य कसं साधावा याबद्दल मार्गदर्शन  केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम वाडेकर यांनी केले. 

या प्रसंगी बोपोडी परिसरातील विद्यार्थ्यांना  ‘गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’ तसेच उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपाई शिवाजीनगर उपाध्यक्ष निलेश वाघमारे,रिपाई पुणे शहर उपाध्यक्ष भीमराव वाघमारे, रोहित अडसूळ,सचिन चव्हाण,राजेंद्र शिंदे,सुरेंद्र आण्णा आठवले, बाळू मोरे,रुपेश पिल्ले,संजय पिल्ले,नंदाताई निकाळजे,निर्मला कांबळे, आरती देठे,उषा शेलार,विशाल निकाळजे,विलास जाधव, कैलास कांबळे, सचिन चव्हाण, सादिकभाई शेख आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.ज्ञानेश जावीर यांनी केले तर सुनीता वाडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!