spot_img
spot_img
spot_img

मोदीजींचे कार्य हे खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ – शत्रुघ्न (बापू) काटे

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाला समर्पित ‘मोदी@11’ अभियानांतर्गत ‘विकसित भारताचा अमृत काळ: सेवा, सुशासन, गरीब कल्याण’ या विषयावरील तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते पार पडले.   भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यावतीने ग. दि. माडगूळकर प्रेक्षागृह, प्राधिकरण, निगडी येथे हे तीन दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले. 
या प्रदर्शनात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांत केलेल्या विकासकामांचे, लोककल्याणकारी योजनांचे आणि सुशासनाचे पैलू मांडण्यात आले आहेत. यामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण यावर विशेष भर देण्यात आला आहे.
यावेळी शहर अध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांत देशाच्या विकासासाठी आणि लोककल्याणासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या त्रिसूत्रीवर आधारित मोदीजींचे कार्य हे खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेला केंद्र सरकारच्या विविध योजनांची आणि धोरणांची सविस्तर माहिती मिळेल. ‘मोदी@11’ हे अभियान केवळ एक प्रदर्शन नाही, तर ते पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीचे, त्यांनी देशासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे आणि सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याच्या त्यांच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे. विकसित भारताच्या निर्मितीसाठी मोदीजींनी टाकलेले प्रत्येक पाऊल हे देशाच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
 या उद्घाटन सोहळ्याला आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, माजी उपमहापौर शैलेजा मोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, चंद्रकांत नखाते, महेश कुलकर्णी, माऊली थोरात, सरचिटणीस अजय पाताडे, संजय मंगोडेकर, विलास मडेगिरी, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, हर्षल नढे, गणेश ढोरे, मंगेश धाडगे, शिवराज लांडगे, रामदास कुटे, अनिता वाळुंजकर, संजय परळीकर, दिनेश यादव, विजय शिनकर, सलीम शिकलगार, रवी देशपांडे, बिभीषण चौधरी, कैलास कुटे, शशिकांत पाटील, देविदास साबळे, गोरक्षनाथ झोळ, खंडूदेव कठारे, महादेव कवितके, संतोष ठाकूर, अभिजित बोरसे, आर.एस.कुमार, गणेश वाळुंजकर, समीर जावळकर, सचिन राऊत, अमेय देशपांडे, भूषण जोशी यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी, विविध मोर्चा, आघाडी, प्रकोष्ठ प्रमुख, मंडल पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख आणि इच्छुक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे प्रदर्शन २२ जून २०२५ ते २४ जून २०२५ या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेला केंद्र सरकारच्या विविध योजनांची आणि धोरणांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘मोदी@11’ अभियान हे पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीचे आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे, अशी माहिती संयोजक अजय पाताडे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसंयोजक विजय शिनकर यांनी केले. आभार माजी उपमहापौर शैलेजा मोरे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!