शबनम न्यूज | प्रतिनिधी
कै. कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान व आधार महिला मंडळ यांच्या संस्थापिका सौ. सुप्रियाताई चांदगुडे यांच्यावतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार (दि. २२) जून रोजी पिरॅमिड हॉल, सांस्कृतिक भवन, शाहूनगर ,चिंचवड येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात एक घास फाउंडेशनचे संस्थापक शिवराज पाटील सर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करून सन्मान करण्यात आला, तसेच दहावी व बारावीच्या नंतर आपले भविष्य घडविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
एक घास फाउंडेशनचे संस्थापक शिवराज पाटील यांनी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना केले. दहावी व बारावीनंतर कशाप्रकारे स्पर्धा परीक्षा देता येईल आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कशाप्रकारे आपण करावा, या संदर्भात मार्गदर्शन केले. तर स्पर्धा परीक्षेबाबत विविध माहिती यावेळी देण्यात आली. त्याच प्रमाणात अन्य शैक्षणिक बाबींची देखील माहिती देण्यात आली, तसेच दहावीनंतर किंवा बारावीनंतर करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास करावा तसेच पालकांनी देखील आपल्या मुलांना कसे प्रोत्साहित करावे, याबाबत सांगण्यात आले. तसेच एक घास फाउंडेशन कशाप्रकारे काम करते ,विद्यार्थ्यांना कशा प्रकारची शैक्षणिक मदत या फाउंडेशन मार्फत होतील, याबाबतची सर्व माहिती शिवराज पाटील यांनी दिली.
यानंतर दहावी आणि बारावी उत्तीर्ण असलेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव सन्मान यावेळी करण्यात आला. याप्रसंगी सौ सुप्रिया चांदगुडे यांचे विशेष कौतुक मान्यवरांनी यावेळी केले. या कार्यक्रमात असंख्य विद्यार्थी, पालक, आधार महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी, विविध मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे, संदीप चव्हाण, संदीप थोरात, संदीप पोलकम, अण्णा लोणकर, सुप्रिया सोलंकुरे, भगवान पठारे, अभय कोटकर ,तुकाराम जाधव, वाडेकर काका, श्रीमंत कदम, गणेश शिंदे, किशोर पवार, रमेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता द्वारका बडगुडे, रत्नमाला कदम ,शोला जगताप, दिपाली कारंजकर, अश्विनी तोरकडे, आशा मेखंडे, स्नेहल चांदगुडे, डॉ. वैदही जंजाळ, आदीका बोराडे, श्रद्धा पवार यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तर आभार सुप्रिया चांदगुडे यांनी मानले.