शबनम न्यूज | प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पुण्यात मुक्कामी असताना घोरपडी गावातील जनसेवा प्रतिष्ठान तर्फे वारकऱ्यांसाठी सकाळी चहा, नाश्ता, दुपारी महाप्रसाद, भजन, कीर्तन, आरोग्य शिबिर आदींचे कार्यक्रम झाले, यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिंडी प्रमुखांचा सन्मान करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे आयोज न जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र खैरे यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया डमरे, पोलीस निरीक्षक सुनिता राठोड, पत्रकार प्रयागा होगे, अनिल राणे, सुवर्णा कांबळे, विठ्ठल मदने, मनीषा सोनवणे, रोहिणी आवड, मीना अटलूर, यास्मिन शेख, मीना जरांडे, लीना भास्कर, राजश्री मुदलियार, अलका शिंदे, आदि यावेळी उपस्थित होते.