spot_img
spot_img
spot_img

श्री कसबा गणपती सामाजिक संस्थेने घेतले १२५ विद्यार्थी दत्तक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे शहराचा मानाचा पहिला श्री कसबा गणपती आणि श्री कसबा गणपती सामाजिक संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना दत्तक योजना गेले २२ वर्षे राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत वर्ष २०२५ मध्ये १२५ चिद्यार्थ्यांना दत्तक घेतले असून या विद्यार्थ्यांची शैक्षणिक मदत या निधीतून पूर्ण केली जाते. हा कार्यक्रम पुण्यात नुकताच संपन्न झाला.
यावेळी या कार्यक्रमात १२५ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. यात पुण्यातील रमणबाग, हुजूरपागा, अहिल्यादेवी आणि विमलाबाई गरवारे अशा अनेक नामवंत शाळांमधील विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बॅंक ओफ इंडियाचे विभागीय अधिकारी संजय कदम, प्रताप टेक्स-केमचे सीईओ कुणाल मराठे,  एसीए ग्लोबल इंडियाचे प्रमुख पारस पारेख आणि सूर्यदत्ता इन्स्टीट्युटचे प्रमुख संजय चोरडीया आणि श्रीकांत शेटे कसबा गणपती मंडळ अध्यक्ष उपस्थित होते.
बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज फ्रेंड सर्कल तर्फे सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा रिकरिंग डिपॉझिट चा पहिला हप्ता भरण्यात येणार आहे. तसेच दहा झाडे वर्षभर जगवल्या मुळे श्री पारेख सर यांच्या हस्ते शिशुविहार कर्वे संस्था या शाळेला दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले.
यावेळी पाहुण्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी त्यांच्या पालकासंह या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!