spot_img
spot_img
spot_img

दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान, दहा हजार शबनम बॅग वाटप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम आहे. दरवर्षी प्रमाणे पुण्यातील दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांचे यंदाही जोरदार स्वागत करण्यात आले.

या विषयी माहिती देताना गौरव प्रमोद दुगड म्हणाले, दुगड ग्रुप आणि पुष्पा स्टील च्या वतीने मागील 25 वर्षा हून अधिक काळ वारकऱ्यांची सेवा करण्यात येते. कै.माणिकशेठ दुगड यांनी सुरू केलेला सेवेचा वारसा प्रमोद दुगड आणि आता मी व माझी पत्नी मोनल दुगड नेटाने चालवण्याचा प्रयत्न करत आहोत.आज दहा हजार वारकऱ्यांना शबनम बॅग वाटप करण्यात आल्या आहेत, महिला वारकऱ्यांना साड्याही वाटप करण्यात आल्या. याशिवाय दरवर्षी प्रमाणे 500 हून अधिक वारकऱ्यांसाठी पंढरपूर ला जाईपर्यंत पुरेल अशी शिदोरी देण्यात आली आहे, यामध्ये गडू, तांदूळ, साखर, गूळ, शेंगदाणे, साबुदाणा, गुडदाणी, बिस्किट आदिचा समावेश आहे. समाजाचे आपण देणे लागतो आणि वारकऱ्यांच्या रूपाने आपल्या शहरात आलेल्या विठ्ठला चरणी सेवा करण्याची संधी म्हणून आम्ही दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो असेही दुगड यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!