spot_img
spot_img
spot_img

भारतीय चित्रपटसृष्टीतील अध्यात्मिक कथनाला एक नवा आयाम देणारा चित्रपट म्हणजे ‘संत तुकाराम’.

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय चित्रपटसृष्टीतील अध्यात्मिक कथनाला एक नवा आयाम देणारा चित्रपट म्हणजे ‘संत तुकाराम’. कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज यांच्या सहनिर्मितीत, आदित्य ओम यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १७व्या शतकातील महान मराठी संत-कवी संत तुकाराम यांच्या जीवनावर, विचारसरणीवर आणि त्यांच्या भक्ति चळवळीवर आधारित आहे.

या चित्रपटात इतिहासाची प्रामाणिक मांडणी, उत्कृष्ट सिनेमा-कलेचे दर्शन आणि प्रभावी थिएटरिक अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. संत तुकाराम यांच्या भूमिकेत मराठी व हिंदी सिनेमा क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेते सुभोध भावे झळकणार आहेत. त्यांच्या प्रभावी अभिनयशैलीमुळे ते तुकारामांच्या दुःख, संघर्ष आणि दिव्य जाणीवेचे प्रभावी चित्रण मोठ्या पडद्यावर सादर करतील.

‘संत तुकाराम’ १८ जुलै २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अशा व्यक्तिमत्वाची कथा सांगतो ज्याची शांतता ही बंडापेक्षा प्रभावी होती आणि ज्याची कविता सत्याची आवाज झाली.

या चित्रपटाची कथा १७व्या शतकातील महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर घडते, जिथे तुकाराम वैयक्तिक दुःखातून बाहेर येऊन समाजातील शोषित, वंचित लोकांचा आवाज बनतात – आपल्या भक्तीमय अभंगांद्वारे.

चित्रपटात एक तगडी कलाकारांची फळी आहे – शिव सूर्यवंशी, शीना चोहान, संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, हेमंत पांडे, गणेश यादव, ललित तिवारी, मुकेश भट्ट, गौरी शंकर, ट्विंकल कपूर, रूपाली जाधव आणि डीजे अकबर सामी हे कलाकार आपापल्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तर दिग्गज अभिनेते मुकेश खन्ना या चित्रपटाचे सूत्रधार म्हणून दिसणार असून, त्यांच्या प्रभावी आवाजातून चित्रपटाला एक आध्यात्मिक दृष्टी आणि संदर्भ मिळणार आहे.

चित्रपटाचे संगीत निखिल कामत, रवि त्रिपाठी आणि वीरल-लावण यांनी दिले आहे. अभंग परंपरेसोबत शास्त्रीय आणि लोकसंगीताचा सुंदर संगम यामध्ये ऐकायला मिळणार आहे. प्रत्येक गीत तुकारामांच्या भक्ती, दुःख आणि संघर्षाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल.

बी. गौतम यांच्या कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज् निर्मित ही भव्य कलाकृती भारतातील सर्व भाषांतील, प्रांतातील आणि धर्मातील प्रेक्षकांना भावेल, हा विश्वास आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!