शबनम न्यूज | प्रतिनिधी
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पिंपरी चिंचवड शहराच्या शहराध्यक्षपदी प्रदीप आहेर यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदीप आहेर यांना देण्यात आले.
नामदार छगन भुजबळ हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पिंपरी चिंचवड शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्य वाढविण्यासाठी तसेच पिंपरी चिंचवड शहरात समता परिषदेच्या माहितीचा विस्तार करण्यासाठी प्रदीप आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदीप आहेर हे अनेक सामाजिक संस्थांवर कार्यरत आहे. चिखली दीपक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित संस्थेवर चेअरमन म्हणून ते सध्या कार्यरत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष आहेत तसेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.त्यांनी आपल्या सामाजिक कामाने पिंपरी चिंचवड शहरात अनेक घटकातील कुटुंबांना मदत केली आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामात प्रदीप आहेर यांचा मोलाचा वाटा आहे, त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच नियुक्ती झाल्यानंतर प्रदीप आहेर यांनी छगन भुजबळ व समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांचे आभार व्यक्त केले.