शबनम न्यूज | प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे श्री संत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत श्रीकृष्ण मंदिर निगडी जवळ संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्या शिबिरात सर्दी खोकला ताप थंडी अंगदुखी पाठ दुखी मान दुखी इत्यादींची तपासणी करून मोफत औषधांचे वाटप केले तसेच वारकऱ्यांच्या पायांची मसाज करण्यात आली.
या तपासणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध विषयातील तज्ञ डॉक्टर आले होते या शिबिराचे उद्घाटन लाइफ पॉईंट हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ राकेश नेवे डॉ सुधीर भालेराव टाटा मोटर्सचे डॉ प्रकाश साखलळकर डॉ शरदचंद्र जगमवार यांच्या. आय एम ए चे अध्यक्ष डॉ. ललित कुमार धोका सचिव: डॉ. मिलिंद सोनवणे हस्ते करण्यात आले.या शिबिरात प्रथमच तंबाखू आणि सिगारेट याचे स्क्रिनिंग करण्यात आले आणि त्याचे दुष्परिणाम काय याच्याविषयी लाईफ पॉईंट हॉस्पिटलच्या वतीने वारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले वारकऱ्यांच्या तपासणीसाठी डॉ मृणाल फोंडेकर डॉ नीरजकुमार पाटील डॉक्टर सेजल खीवसरा डॉ अनुजा चोपडा डॉ सुलोचना राठोड डॉ विजय भळगट डॉ संजय साळवे डॉ मृदुला स्वामी.डॉ प्राची हेंद्रे संजय साळवे डॉ आरोही जाधव कनिष्का भन्साळी डॉ. अनिकेत नलगे यांनी तपासणी केली. या शिबिरात प्रथमच आयएमएचा सहभाग होता तसेच ताम्हाणे हॉस्पिटल चिंचवड भालेराव हॉस्पिटल आकुर्डी यांनी सहकार्य केले. या शिबिरासाठी लक्ष्मी मेडिकल चिंचवड सप्तशृंगी मेडिकल काळेवाडी राहुल मेडिकल प्राधिकरण श्री मनोज शिंदे आणि श्री मोहन पटाधारी यांनी औषधांसाठी मदत केली.
या शिबिराचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड संध्या स्वामी सायली सुर्वे अनुषा पै पल्लवी नायक अरुण कळंबे ओम पाथरे निलेश मस्के रमेश बामणे विजय आगम मनीषा आगम आनंद पाथरे राजेंद्र फडतरे सुनंदा निकरड मनोहर कड सुधाकर खुडे विनोद सुर्वे शिवाजी पाटील सिद्धी ढेरे स्तुती सोमवंशी सायली यादव भक्ति सरडेअंजली प्रधान महावीर कदापुरे अनिल हूलावले यांनी केले होते. या शिबिरानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत भक्ती शक्ती ते पवळे उड्डाणपूल पर्यंत स्वच्छता अभियान करण्यात आले