spot_img
spot_img
spot_img

आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन…

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज पहाटे ४ वाजता आकुर्डी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन व आरती करण्यात आली.

दर्शन व पूजेनंतर आयुक्त शेखर सिंह यांचा आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसदस्य प्रमोद कुटे,कुंडलीक महाराज मोरे,अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सह शहर अभियंता नितीन देशमुख, उप आयुक्त सचिन पवार, क्षेत्रिय अधिकारी निवेदिता घार्गे, अतुल पाटील, किशोर ननवरे, कार्यकारी अभियंता विजय भोजने, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संतोष कुटे,प्रविण कुटे,तुकाराम कुटे,गिरीश कुटे तसेच नागरिक उपस्थित होते.

महापुजेनंतर विठुनामाच्या घोषात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्याच्या दिशेने प्रस्थान झाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!