spot_img
spot_img
spot_img

सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या ; पतीला अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सासरच्या छळाला कंटाळून एका महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलासह इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवार (दि. १८) जून रोजी कात्रज भागातील आंबेगाव भागात घडली. या घटनेनंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेचा पती शशिकांत देशमुख याला पोलिसांनी अटक केली आहे. मयुरी शशिकांत देशमुख व सहा वर्षाचा मुलगा विष्णू शशिकांत देशमुख अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आई मुलाची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी शशिकांत देशमुख या बालवाडी शिक्षिका होत्या. त्यांचे पती शशिकांत हे एका बँकेत नोकरी करत आहेत. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मयुरीने सहा वर्षाचा मुलगा विष्णू याच्यासह पाचव्या मजल्यावरून उडी मारली, त्यावेळी मयुरीचे पती घरात नव्हते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयुरी व सहा वर्षाचा मुलगा विष्णू या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आत्महत्या करण्यापूर्वी मयुरीने चिट्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये सासरच्यांकडून सतत शिवीगाळ ,मारहाण व दमदाटी होत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्ती केल्या प्रकरणी मयुरीच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!