शबनम न्यूज
उद्धव ठाकरे यांची मुंबईत मोठी ताकद, त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागेल असे शरद पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना बारामती येथे सांगितले.
आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबई काबीज करण्यासाठी भाजप, शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढणार की वेगवेगळे हे अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपने मुंबई काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेसोबत तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर भाजप मुंबई महानगरपालिका जिंकणार असल्याचे त्यांच्या पक्षाच्या वतीने अनेक वेळा सांगण्यात आले. परंतु मुंबईत आज पर्यंत ठाकरे यांच्या नावाचे वलय राहिले आहे .तसेच मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच झेंडा दरवेळी फडकला आहे . मागच्या महानगरपालिका निवडणुकीतही भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली असताना शिवसेनेने बाजी मारत मुंबई महानगरपालिका स्वतःकडे ठेवण्यास यश संपादन केले होते. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही शिवसेनेचे दोन शिवसेना झाले आहे तसेच त्या शिवसेनेच्या बरोबरीने ने देशातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आणि भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
परंतु मुंबई महानगरपालिका व मुंबई शहरावर नेहमीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठी ताकद राहिली आहे व ती आजही कायम आहे असे शरद पवार यांच्या वक्तव्यावरून समजते. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका निवडणुकी करिता महाविकास आघाडी चर्चा करणार असून उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेऊन पुढील महानगरपालिका निवडणूक कशी लढवायची याबाबत व्युहरचना करणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी आज बारामती येथे दिले आहे.
दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार हे अजूनही अस्पष्ट आहे. त्यामुळे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडी सोबत जाते की मनसेच्या सोबत युती करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.