spot_img
spot_img
spot_img

त्रिवेणी रमेश बहिरट यांना “स्पिरिच्युअल काउन्सेलिंग” क्षेत्रात केनेडी विद्यापीठाचा मानद डॉक्टरेट सन्मान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुण्यातील डॉ.त्रिवेणी बहिरट (संचालिका, प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर) यांना केनेडी युनिव्हर्सिटी, फ्रान्स यांच्या वतीने स्पिरिच्युअल काउन्सेलिंग (आध्यात्मिक सल्ला) या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “मानद डॉक्टरेट” पदवी गोव्याचे मुख्यमंत्री दिगम्बर कामत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

हा गौरव सोहळा नुकताच वेळेत गोव्याच्या सी ब्रिज सारोवर पोरटिको, लोंगोट्टेम, वार्का (दक्षिण गोवा) येथे अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमास अनेक मान्यवर, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि अभ्यासक उपस्थित होते. त्रिवेणी बहिरट यांचे अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य, अनेकांचे जीवन सकारात्मक रूपात बदलणारे ठरले आहे. त्यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने असंख्य लोकांनी मानसिक, भावनिक आणि आत्मिक समाधान अनुभवले आहे.

केनेडी युनिव्हर्सिटीने त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांना हा मानाचा सन्मान बहाल केला. यावेळी बोलताना त्रिवेणी बहिरट यांनी हा सन्मान म्हणजे “समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या प्रवासाची पावती आहे,” असे नमूद केले.

कार्यक्रमाची सांगता केनेडी युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींनी भावनिक अभिनंदनपर भाषणांनी केली. उपस्थित सर्वांनी उभ्या राहून टाळ्यांच्या गजरात बहिरट यांचा गौरव केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!