spot_img
spot_img
spot_img

पाऊस आणि पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, अडथळे दूर करण्यासाठी आणि पाणी साचण्याच्या ठिकाणी किंवा पूरस्थितीच्या घटनांवर त्वरित प्रतिसाद
देण्यासाठी संपूर्ण पावसाळी आपत्कालीन योजना अंमलात आणली आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत असून, तीन शिफ्टमध्ये कार्य करणारी समर्पित पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पाण्याचा संचय होण्याची शक्यता असलेले संवेदनशील भाग ओळखून तिथे जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत.

ही पथके पंप, बचाव साहित्य आणि आवश्यक मनुष्यबळाने सज्ज आहेत. अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १५ हून अधिक बचाव बोटी आणि २०० लाईफ जॅकेट्स सज्ज ठेवली आहेत. पवना आणि इंद्रायणी
नद्यांलगत असलेल्या पूरग्रस्त भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने, महापालिकेच्या आरोग्य पथकांना पाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांवर लक्ष ठेवण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. संवेदनशील भागात
निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तात्पुरत्या निवाऱ्यांची देखील नोंद घेण्यात आली आहे.

पाणीपुरवठा व विद्युत विभाग भूमिगत आणि उघड्या पायाभूत सुविधांवर लक्ष ठेऊन आहेत. पावसाळी मानक कार्यपद्धती पूर्ण क्षमतेने राबवण्यात येत असून, प्रशासन सतत हाय अलर्ट मोडवर आहे. तरी नागरिकांनी वेळोवेळी सूचनांवर लक्ष ठेऊन सहकार्य करावे व जागरूक राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पावसाची संततधार सुरू असली तरी घाबरण्याचे कारण नाही. पालिकेने संभाव्य स्थितीचा विचार करून योग्य ती नियोजनबद्ध तयारी केली आहे. संबंधित यंत्रणा, मनुष्यबळ आणि साधने तैनात करण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहून जवळच्या नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा. महापालिका सुरक्षितता आणि अत्यावश्यक सेवा अखंड ठेवण्यास कटिबद्ध आहे.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नागरिकांसाठी महत्त्वाचे नियंत्रण कक्ष क्रमांक:
मुख्य पूर नियंत्रण कक्ष (मुख्यालय): 020-67331111 / 020-28331111
अग्निशमन व आपत्कालीन सेवा: 9922501475 / 27423333
अग्निशमन नियंत्रण कक्ष अधिकारी आणि सहाय्यक मोबाईल (WhatsApp) नंबर –
7757966049
केंद्रीय हेल्पलाइन: 020-67333333 / 9922501451

क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियंत्रण कक्ष क्रमांक:
अ क्षेत्रीय कार्यालय – 020-68334000 / 9922501454
ब क्षेत्रीय कार्यालय – 020-68334300 / 9922501455
क क्षेत्रीय कार्यालय – 020-68334500 / 9922501457
ड क्षेत्रीय कार्यालय – 020-68334700 / 9922501459
ई क्षेत्रीय कार्यालय – 020-68335000 / 8605722777
फ क्षेत्रीय कार्यालय – 020-68335300 / 8605422888
ग क्षेत्रीय कार्यालय – 020-68335500 / 7887879555
ह क्षेत्रीय कार्यालय – 020-68335700 / 9130050666

 पालखी सोहळ्यासाठी विशेष तयारी
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळा पिंपरी चिंचवड हद्दीतप्रवेश करत असल्याने, महापालिकेच्या विविध विभागांनी मिशन मोडमध्ये कार्यवाही सुरू केली आहे, जेणेकरून आषाढीवारी पालखी मार्गावर कोणताही अडथळा येऊ नये. आयुक्त शेखर सिंह यांनी पालखी मार्गावर कुठेही पाणी साचू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

याशिवाय विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, स्टॉर्म वॉटर चेंबरच्या झाकणांवर लक्ष ठेऊन कचऱ्यामुळे अडथळा निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यात येत आहे. भोसरी, दिघी आणि निगडी परिसरात यांत्रिक साधनांनी सुसज्ज आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत.

नागरिकांना सूचना

  • पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेल्सवर वेळोवेळी लक्ष ठेवावे.
  • पाणी साचणे, झाडे पडणे किंवा वीजविषयक तक्रारी असल्यास लगेच नियंत्रण कक्षाशी संपर्क
    साधावा.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!