शबनम न्यूज | प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी (१९ जून) श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. पुणे पोलिसांकडून पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. सोहळ्यातील वारकरी, तसेच भाविकांची गर्दी विचारात येऊन यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्यात येणार आहे. गर्दीवर लक्ष ठेवणे आणि नियोजनासाठी हे तंत्रज्ञान वापर करण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्यातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भाविकांची सुरक्षा, तसेच पालखी सोहळ्यात भाविकांकडील ऐवज चोरीला जाण्याच्या घटना विचारात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
विश्रांतवाडी चौक, संचेती चौक, डेक्कन जिमखाना भागातील नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, गोखले स्मारक चौक (गुडलक चौक), हडपसर गाडीतळ, दिवे घाट येथे ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.