शबनम न्यूज , प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचा कार्यकाळ हा लांबला आहे साधारण आयुक्तांचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा असतो व शेखर सिंह यांना तीन वर्ष होऊन गेले आहेत त्यांची लवकरच बदली होणार आहे असे संकेत आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पिंपरी चिंचवड शहर कार्यकर्ता मेळावा 17 जून रोजी भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे सभागृहात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी अजित पवार बोलत होते.
पिंपरी चिंचवड शहरात रेड झोन चा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने सर्वे करण्यात आला आहे. मोजणी केली,परंतु त्याचा अधिकृत नकाशा महापालिका वतीने प्रसिद्ध करण्यात आला नाही, टी. डी. आर. चा पण प्रश्न आहे. पिंपरी चिंचवड शहरात अनेक प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नोट करून द्यावेत सध्याच्या आयुक्तांना बराच काळ झाला आहे . तीन वर्षात बदली होत असते जसे पुण्यामध्ये नवीन आयुक्त आले तसेच नवीन आयुक्त आता लवकरच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत येणार आहेत असे आपल्या भाषणात अजित पवार यांनी सांगितले.
महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी 2022 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला त्यानंतर आता 2025 मध्ये त्यांना तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांचा आयुक्त पदाचा कार्यकाळ आता संपुष्टात येणारा असून नवीन आयुक्तांची नियुक्ती लवकरच होईल .
तसेच अजित पवार यांनी सांगितले की नवीन आलेल्या आयुक्तांना आपण पिंपरी चिंचवड शहरातील टी. पी. डी.पी. व शहरातील विकास आराखड्या बाबत बोलू व त्यातून मार्ग काढू.