spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड शहरात कोणत्याही धार्मिक स्थळावर कारवाई होऊ देणार नाही – अजित पवार

शबनम न्यूज , प्रतिनिधी : 
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने राबविण्यात येणाऱ्या शहर विकास आराखड्यामध्ये शहरातील अनेक धार्मिक स्थळांना नोटीशी बजावण्यात आले , धार्मिक स्थळे हटविण्याबाबत कळविण्यात आले परंतु मी कोणत्याही परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील धार्मिक स्थळांना धक्का लागू देणार नाही असे अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहरातील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने आरक्षणे आखण्यात आली असून बऱ्याच ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आरक्षणे पाडण्यात आली आहे त्याबाबत हरकती ही दाखल झाल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने अनेक धार्मिक स्थळांना अतिक्रमाना संदर्भात नोटीसी बजावण्यात आल्या होत्या.

सुदैवाने मी पालकमंत्री आहे. मी कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही पिंपरी चिंचवड शहरातील चिखली, कुदळवाडी भागातील ३१ धार्मिक स्थळांना त्यामध्ये 18 मशीद व 13  मंदिर होती यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने अतिक्रमाना संदर्भात नोटीशी देण्यात आल्या होत्या. यासंदर्भात मला मार्ग काढण्यासाठी आपल्या पिंपरी चिंचवड करांनी सांगितले असता. मी आयुक्तांची बैठक घेऊन सांगितले की नागरिकांच्या भावना कोणत्याही समाजाचे असो दुखावू नये , नागरिकांच्या धार्मिक भावनांना धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये या संदर्भात मी आदेश दिल्यानंतर त्या धार्मिक स्थळांवर अतिक्रमणाची कारवाई थांबली. या संदर्भात कायमचा मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!