शबनम न्यूज , प्रतिनिधी –
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत आहे. या वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे पिंपरी चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघ नंतर आता आगामी येणाऱ्या 2029 च्या विधानसभा निवडणुकीत आणखीन दोन विधानसभा मतदारसंघ निर्माण होणार असून पिंपरी चिंचवड शहरात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ होणार असल्याचे अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.
भोसरी मध्ये राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा मंगळवारी संपन्न झाला या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात सांगितले की, भोसरी व चिंचवड या विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या सध्या 13 लाख आहे व पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या चार लाख झाली आहे अशी एकूण पिंपरी चिंचवड शहरात मतदारांची संख्या 17 लाख किंबहुना साडे सतरा लाख झाली आहे. आता जातनिहाय जनगणना करण्याचा एनडीए सरकारने निर्णय घेतला 2025 व 2026 या कालावधीत ही जनगणना होणार आहे. व ही जनगणना झाल्यानंतर नक्कीच आगामी 2029 मध्ये मतदार संघाची फेररचना होणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात किमान चार मतदार संघ शंभर टक्के होणार आहे. व कदाचित मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली व पाचवा मतदारसंघ झाला तर आश्चर्य वाटू देऊ नका असे अजित पवार यांनी सांगितले.