चला शाळा सुरू झाली असे म्हणत नवीन दप्तर नवीन गणवेश नवीन वर्ष नवे वर्ग नवे मित्र मैत्रिणी तसेच प्रत्येक तासाला नवीन गमती जमती आता सुरू झाल्या. शाळेचा पहिला दिवस सर्वांसाठी एक आनंदीमय अनुभव देणारा दिवस असतो. बोपखेलच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या पहिली च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे औक्षण करून उत्साहात स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे युवा नेते भाग्यदेव घुले यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
यावर्षी पाठ्यपुस्तकांच्या रचनेत बदल करून सर्व विषयांचा समावेश असलेले एकात्मिक पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे यामुळे विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे मोठे वाटणार नाही दप्तराचे ओझे आता कमी झाले आहे. नवीन प्रवेश करत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसोबतच चॉकलेट बिस्किट व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचा अनुभव हा आयुष्यभर लक्षात राहत असतो त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी उत्साहात स्वागत केल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होते त्यामुळे आपण या विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी शाळेत हजर राहिल्याचे यावेळी शिवसेनेचे युवा नेते भाग्यदेव घुले यांनी सांगितले. यावेळी शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळेच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.