शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत ६ क्रीडा प्रबोधिनीत रिक्त जागेवर सन २०२५-२६ करिता सरळप्रवेश ५० टक्के व कौशल्य चाचणीद्वारे ५० टक्के प्रक्रियेअंतर्गत खेळाडूना प्रवेश देण्यात येणार असून खेळाडूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.
क्रीडा प्रबोधनीत एकूण १७ क्रिडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते. तथापि व्हॉलीबॉल करीता १३, सायकलिंग ३, जलतरण ७, फुटबॉल ७, ज्युदो ५, जिम्नॅस्टिक्स ९ खेळाडूंची रिक्त जागा असल्याने याच खेळातील खेळाडूंनी अर्ज करावे.
जिल्हास्तरावर क्रीडा प्रबोधिनी विभाग चाचणीसाठी सहभागी होणा-या खेळाडूंची नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नोंदणी करावी. तरी प्रवेशाकरीता खेळाडूंचे नाव, जिल्हा, खेळप्रकार, जन्मदिनांक, वय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र याबाबत माहिती संकलित करुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे २४ जून २०२५ पर्यंत सादर करावी, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.