spot_img
spot_img
spot_img

गांजा विक्री करणाऱ्या कल्याणी देशपांडेला अटक !

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुण्यातील कुप्रसिद्ध कल्याणी देशपांडे ला पिंपरी- चिंचवडच्या अंमली विरोधी पथकाने आंध्रप्रदेशमधून बेड्या ठोकल्या आहेत. पिटासह मोका गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगून आलेली कल्याणी गांजा विक्री रॅकेटची मास्टरमाइंड आहे. काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याणी देशपांडेच्या गांजा रॅकेटचा पर्दाफाश केला होता. तिच्या पतीसह जावयाला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तेव्हा, कल्याणी देशपांडे फरार होण्यात यशस्वी झाली होती.

कल्याणीचा शोध पिंपरी- चिंचवड पोलीस घेत होते. याच दरम्यान कल्याणी देशपांडे ही आंध्रप्रदेशमधील इस्ट गोदावरी जिल्ह्यातील राजनगरममध्ये भाड्याच्या खोलीने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या टीम त्याठिकाणी पोहचली. सापळा रचून तिला अटक करण्यात आली आहे.

कल्याणी देशपांडे गांजाच रॅकेट चालवायची. काही दिवसांपूर्वी बावधन येथील निवस्थानी छाप मारून २० किलो गांजा जप्त केला होता. पती, जावई ला बेड्या ठोकल्या होत्या. कल्याणीचा शोध घेत असताना तिला देखील आंध्रप्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. कल्याणी देशपांडेच काही वर्षांपूर्वी वेश्याव्यवसायाच जाळ होत. पिटा आणि मोका गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेली आहे. अधिक चा तपास अमली पदार्थ विरोधी पथक करत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!