शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या संतसृष्टी, संतपीठसह विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ बुधवार, दि.१८ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांनी संतपीठ तसेच चिखली टाऊन हॉल येथे भेट देत कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेतला.
याप्रसंगी महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, नितीन देशमुख, उपायुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता सुनिल पवार, प्रेरणा सिंनकर, शिवराज वायकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, संतपीठाचे संचालक डॉ.सदानंद मोरे, डाॅ.स्वाती मुळे, राजू महाराज ढोरे, प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन, उद्घाटन व लोकार्पण चिखली येथील टाऊन हॉल येथे १८ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तसेच टाळगाव चिखली येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या संतपीठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट देणार असून येथील प्रेक्षागृह व कलादालनचे लोकार्पण करणार आहेत.
याठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये १.५० लाख देशी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यासर्व कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे आणि तृप्ती सांडभोर यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन घेतला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या तयारीमध्ये कोणतेही कमतरता राहू देऊ नका, आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करा, नियोजन योग्य पद्धतीने करा, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.