शंकर बारवे यांनी ‘एस. बी. प्रॉडक्शन प्रा. लि.’ कंपनीची २०१० साली स्थापना केली. जाहिरात, माहितीपट, लघुपट, डिजिटल माध्यम, सोशल मीडिया ब्रँडिंग आणि ३६० डिग्री मीडिया कम्युनिकेशनमध्ये बारवे यांचे नाव महाराष्ट्रात अग्रस्थानी आहे. ‘आयडिया ते इम्पॅक्ट’ या तत्वावर कार्यरत बारवे सर्जनशील व कल्पकपणे प्रकल्प साकारत असतात. याशिवाय ‘एस. बी. सोशल फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात योगदान देत आहेत. विद्यार्थी सहायक समितीच्या उपक्रमात त्यांचा सहभाग असतो व ते माजी विद्यार्थी मंडळावर विश्वस्त आहेत. पंधरा वर्षाच्या अनुभवांच्या आधारावर लिहिलेले ‘ब्रँड संवाद’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.
निर्माता-दिग्दर्शक शंकर बारवे यांना ‘ग्रीनवर्ल्ड सेल्फमेड मॅन २०२५’ पुरस्कार
शबनम न्यूज | प्रतिनिधी
मीडिया आणि ब्रँड कम्युनिकेशन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल निर्माता-दिग्दर्शक आणि माध्यम सल्लागार शंकर बारवे यांना ‘ग्रीनवर्ल्ड सेल्फमेड मॅन २०२५’ हा प्रतिष्ठित पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव आयएएस अधिकारी सुनिल चव्हाण व पुण्याचे प्राप्तिकर आयुक्त अजय केसरी यांच्या हस्ते बारवे यांना सन्मानित करण्यात आले. नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित सोहळ्याप्रसंगी ग्रीनवर्ल्ड संस्थेचे अध्यक्ष गौतम कोतवाल, बारवे यांच्या पत्नी निशा बारवे, मुलगा विराज, आई कांताबाई बारवे, वडील गुलाबराव बारवे हेही उपस्थित होते.
शंकर बारवे यांनी जिद्दीच्या, नवनिर्मितीच्या जोरावर प्रेरणादायी वाटचाल केली आहे. बारवे यांनी दिग्दर्शित केलेले लघुपट व माहितीपट भारताचे माननीय राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध केंद्रीय व राज्यातील मंत्री महोदय आणि नामवंत मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित व प्रकाशित झाले आहेत. शंकर बारवे यांनी महाराष्ट्र शासनासाठी राबवलेल्या अनेक महत्त्वाच्या जनजागृती मोहिमा, योजना प्रचार व प्रसिद्धी, खाजगी ब्रँड कॅम्पेन्स, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रकल्प हे सर्व त्यांच्या कुशल दिग्दर्शन व ब्रँड दृष्टीकोनामुळे प्रभावी ठरले आहेत.