आदर्श शिक्षण संस्थेच्या प्रांगणात नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याच्या निमित्ताने प्रवेशाचा जल्लोत्सव साजरा करण्यात आला.
बालवाडी ,प्राथमिक,माध्यमिक विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने आज एवढ्या पावसाळी वातावरणात उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बारसे यांच्या उपस्थितीत शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियांका बारसे, उपमुख्याध्यापिका चित्रा औटी बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सुषमा कुंभार, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वंदना लढे यांनी मुलांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले.
यावेळी मुलांना शासनाची मोफत पाठ्यपुस्तके वाटण्यात आली. टाळ्या वाजवून मुलांवर फुले उधळून ,फुगे -खाऊ वाटून जल्लोषात मुलांचे स्वागत झाले.यावेळी विद्यार्थ्यांना शाळेत आल्याचा व आपल्या मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता.
भदाडे सरांनी रांगोळी -फलकलेखनातुन तर मोडक मॅडम यांनी सेल्फी पाईंट बनवुन तर शिक्षकांनी शाळा तोरणांनी फुग्यांच्या माळांनी सजवली .गायकवाडसरांनी शब्दसुमनांची उधळण करुन शिक्षक विद्यार्थी व पालकांना नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोठ्या संख्येने पालकवर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते.