शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरात दिनांक 15 जून 2025 रोजी रविवार सायंकाळी 5 वाजता कै. भिवाजी सहाणे सभागृह गणेश मंदिर इंद्रायणी नगर भोसरी येथे इंद्रायणी युवा प्रतिष्ठान व तुषार सहाणे युवा मंच यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 8 मधील 10 वी व 12 वी मध्ये 85 % वरील गुणांनी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करियर मार्गदर्शन सोहळ्याला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रा. संदीप पवार ( डायरेक्टर मोशन अकॅडमी, मोशी व युनिक अकॅडमी सांगवी पुणे) यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर संधि आणि प्रवेश प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले तर प्रा. जितेंद्र पवन (आय. आय. टी. मुंबई) यांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील करियर संधि आणि प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केले तसेच प्रा. डॉ. कैलास सोनवणे ( स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन) मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख मान्यवर म्हणून रूपेश पारुळेकर, सदाशिव ( बापू) आगळे, प्रकाश सहाणे, रघुनाथ हांडे, विठ्ठल (नाना) वाळूंज, भास्कर दातीर, अजिंक्य पोटे, विनोद जाधव, विश्वनाथ टेमगिरे, सुरज झांजूर्णे, स्वप्नील ओव्हाळ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. प्रा. संदीप पवार सरांनी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले व प्रा. जितेंद्र पवन सरांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले.
तसेच प्रा. डॉ. कैलास सोनवणे सरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा चे मार्गदर्शन केले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन दिले. परिश्रमाचे महत्व पटवून दिले गेले आणि समाजसेवा व शिक्षण यांचा समन्वय कसा साधावा हे सांगितले गेले. विद्यार्थ्यांना करियरच्या विविध संधिबद्दल मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याचे महत्व उलगडून सांगण्यात आले. पोलिस प्रशासन उद्योग आणि इतर क्षेत्रात कामगिरी केलेल्या अनुभवांचे दाखले देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली गेली.
प्रभागतील इयत्ता 10 वी मधून प्रथम क्रमांक वेदांत प्रकाश खैरणार व संची मंगेश घोलप द्वितीय क्रमांकावर सार्थक आदिनाथ नामदे व प्राजक्ता पांडुरंग देशमुख तृतीय क्रमांकावर स्वरा सचिन रासकर, उदयसिंह फडतरे व गौरी हणमंत पवार आणि 12 वी मधून प्रथम क्रमांक कौशल अशोक टोपे, द्वितीय क्रमांकावर वैभव काळे व सुमन मोनदल तृतीय क्रमांकावर रेचल वैभव लकारे त्याचा बरोबर एकूण 290 गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या अनुभवांच्या कथा विद्यार्थ्यांसामोर मांडल्या व प्रोत्साहित केले.