spot_img
spot_img
spot_img

भुशी धरण ओव्हर फ्लो! पर्यटकांची मोठी गर्दी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण हे १६ जून रोजी पहाटेच्या सुमारास ओव्हर फ्लो झाले व परिसरातील व्यावसायकांनी जल्लोष केला. मागील महिनाभरापासून पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाण्याचा साठा वाढला होता. लोणावळ्यात रविवारी रात्री ते सोमवारी सकाळ पर्यंत १४३सेंमी(५. ६३ इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आज सकाळपासूनच सहारा पुल धबधबा व भुशी धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली. सकाळच्या वेळेत धरण ओव्हर फ्लो होऊन वाहू लागल्याने धरणाच्या पायर्‍यांवर बसून भिजण्याचा आनंद अाज (सोमवारी) पर्यटकांना घेता आला. मागील आठवड्यांपासून पर्यटक भुशी धरण भरण्याची वाट पाहत होते. धरणाचा पाणीसाठा तळाला असताना देखील पर्यटक धरणावर गर्दी करत होते.मागील आठवड्यापासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसाने आज अखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायिकांची प्रतिक्षा संपवली. मागील वर्षी ३० जुन रोजी भुशी धरण भरले होते या वर्षी पंधरा दिवस अगोदरच धरण भरून ओसंडून वाहू लागले आहे.

संततधार कोसळणार्‍या पावसामुळे डोंगरातील धबधबे मोठ्याप्रमाणात वाहू लागल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरणही ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. धरण‍ाच्या सांडव्यावरुन पायर्‍यांवर पाणी वाहू लागले आहे. पर्यटक याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. त्यामुळे येत्या वीकेंडला जर तुम्ही पर्यटनासाठी बाहेर पडणार असाल, तर भुशी धरणाचा चांगला पर्याय आता उपलब्ध झाला आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!