शबनम न्यूज | प्रतिनिधी
गुंतवणुकीच्या आमिषाने निवृत्त लष्करी अधिकाऱ्यासह चार ते पाच जणांची १० कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मनीष केदारनाथ सुरवसे (वय ४८, रा. बी. टी. कवडे रस्ता) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरवसे हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. एका नातेवाईकाच्या मदतीने त्यांची आरोपींशी सप्टेंबर २०२४ मध्ये ओळख झाली होती. आरोपींनी सुरवसे यांच्यासह मित्रांना गुंतवणुकीवर ३० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करून ‘लर्नोवेशन इंडिया’ या ट्रेडिंग एज्युकेशन फर्ममध्ये तीन कोटी २५ लाख २८ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
सुरवसे यांच्यासह त्यांच्या मित्रांना जादा परताव्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आरोपींनी आतापर्यंत चार ते पाच जणांची १० कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे तपास करत आहेत.