शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिवसेना शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख तथा उपनेते इरफानभाई सय्यद यांचा मंगळवारी (दि. १७) रोजी वाढदिवस आहे. तो साजरा होणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.
दरम्यान इरफानभाई सय्यद यांच्या वडिलांचे ८ ऑक्टोबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण सय्यद कुटुंब अजूनही दुखातून सावरले नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
इरफानभाई सय्यद यांचा वाढदिवस म्हणजे दरवर्षी विधायक आणि सामाजिक उपक्रमांची मेजवानी असते. दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरे, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, अनाथांना वस्तूंचे वाटप, रोजगार मेळावे भरत असत. त्या माध्यमातून दिन दुबळ्यांची सेवा घडताना दिसत असे. कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह ओसंडून वाहायचा. शिवसेनेचे मोठे राजकीय शक्तीप्रदर्शन त्या माध्यमातून साधले जायचे. यंदा इरफानभाई यांचा वाढदिवस उद्यावर आलेला असताना देखील सर्वत्र शांतता पसरली आहे.
दरम्यान इरफानभाई यांची वाढदिवस साजरा न करण्याबाबत सोशल मिडीयावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यातील मजुकर वाचून अनेकजण भारावून जाताना दिसत आहे.
…. यंदाचा वाढदिवस एक भावनांची उर्मी …
”माझा वाढदिवस दरवर्षी १७ जून रोजी आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि उत्साहात साजरा होत असतो.
आपण सर्वांनी गेल्या कित्येक वर्षांपासून मला भरभरून प्रेम, साथ आणि आशीर्वाद दिले आहेत.
परंतु यंदा… माझ्या वडिलांचे दुःखद निधन झाले असल्याने अंतर्मन ढवळून निघतंय.
त्यामुळे, यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी व माझे सहका-यांनी घेतला आहे.
माझ्यावर मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते, कामगार वर्ग, मित्र परिवार आणि शुभचिंतकांनी माझी ही भावना समजून घ्यावी, ही नम्र विनंती आहे.
या काळात तुम्ही फक्त तुमची मौन साथ, समजूत आणि संयम हीच माझ्यासाठी खरी शक्ती ठरेल.
तुमच्या प्रेमासाठी आणि सदैव मिळणा-या आधारासाठी मनःपूर्वक आभार”…
– इरफानभाई, संपर्कप्रमुख शिरूर लोकसभा शिवसेना उपनेते / सदस्य : महाराष्ट्र राज्य माथाडी कामगारट सल्लागार समिती महा. शासन…