spot_img
spot_img
spot_img

कुंडमळा येथील घटना अतिशय दुर्देवी – खासदार श्रीरंग बारणे

मावळ – मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल कोसळून  झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेत पाच पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, ३२ हुन अधिक पर्यटक जखमी आहेत. सहा गंभीर जखमी आहेत. पाण्यात वाहून गेलेल्या पर्यटकांचे शोधकार्य सुरू आहे. हा पूल जीर्ण झाला होता. असे जीर्ण पूल तातडीने दुरुस्त करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
खासदार बारणे म्हणाले, कुंडमळ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे.  
कुंडमळा नदी ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठीचा हा पूल आहे. पूल जीर्ण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच मावळातील प्रशासनासोबत बैठक घेतली होती. पर्यटन स्थळावर अधिकचा बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कुंडमळ्यातील लोखंडी पूल जीर्ण झाला होता. मावळात मोठी पर्यटन स्थळे आहेत. अनेक ठिकाणच्या पुलंची दुरवस्था झाली आहे. तातडीने ते दुरुस्त करावेत. 
कुंडमळ्यातील दुर्घटनेत जखमी झालेल्याना सर्वतोपरी मदत केली जात आहे. सोमटाने येथील रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांच्या संपर्कात असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!