spot_img
spot_img
spot_img

लायन्स इंटरनॅशनल राबवणार महत्वाकांक्षी नया सवेरा उपक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

लायन्स इंटरनॅशनल ही वैश्विक पातळीवर काम करणारी एक सामाजिक संस्था असून, या माध्यमातून अत्यंत व्यापक प्रमाणात सेवा कार्य गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. नुकतीच माझी लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 च्या प्रांतपाल पदी निवड करण्यात आली आहे. लायन्स इंटरनॅशनल दृष्टिहिनांना नवजीवन देणारा असा नया सवेरा हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवेल, अशी माहिती नवनियुक्त प्रांतपाल राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

लायन्स इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट 3234D2 च्या प्रांतपाल पदी राजेश अग्रवाल यांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वात भविष्यात लायन्सतर्फे राबवण्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी श्रमिक पत्रकार भवनात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला लायन्स क्लबचे माजी इंटरनॅशनल डायरेक्टर नरेंद्र भंडारी, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभय शास्त्री, कॅबीनेट सचिव सलील कारखानीस आणि कॅबीनेट कोषाध्यक्ष रामचंद्र शाह यांच्यासह लायन्स क्लबचे इतर पदाधिकारीदेखील उपस्थित होते.
राजेश अग्रवाल पुढे म्हणाले की, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमिळून ११४ कल्ब मधून सुमारे साडेपाच हजार सदस्य तसेच एक लाखांहून अधिक स्वयंसेवक येथे कार्यरत आहेत. दरवर्षी १०० पेक्षा अधिक कायमस्वरूपी प्रकल्प आणि हजारो सेवाभावी उपक्रमांद्वारे सुमारे ५ लाख गरजू नागरिकांना क्लबच्या वतीने मदत दिली जात आहे. लायन्स क्लब गरजूंना अन्नदान, युवक कल्याण, पर्यावरण, डायबिटीस, चाईलल्डहुड कॅन्सर यासह विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम लायन्स क्लब करीत आहे.

लायन्स इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट 3234D2 तर्फेदेखील मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये दरवर्षी ५ हजार गरजू रुग्णांना मोफत नेत्र तपासणी, उपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, १०० हून अधिक डायलिसिस मशीन्सद्वारे रुग्णांना उपचार, मोफत ओपीडी, दंत उपचार व फिजिओथेरेपी केंद्रे चालवली जात आहेत. या कार्याला आणखी पुढे नेण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये २ लाख विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी व उपचार केले जातील. गर्भाशयाच्या कर्करोगावर जनजागृती आणि मोफत लसीकरण मोहीम राबवली जाईल. नवा सवेरा अंधत्व निर्मूलनासाठीचा पाच वर्षांचा व्यापक प्रकल्प राबवला जाणार आहे. हा उपक्रम दृष्टिहिनांना नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. यासह अनेक प्रकारचे उपक्रम आगामी काळात राबवले जाणार असल्याची माहिती राजेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!