शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने गवळीनगर प्रभागातील बन्सल सिटी परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. तथापि पावसाळी वातावरण असल्याने या कामात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सोमवारपासून या भागात शाळा सुरू होत आहेत, शालेय विद्यार्थ्यांना या कामांचा तसेच या ड्रेनेज लाईन कामामुळे कोणत्याही प्रकारचे अपघात होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना या भागातील माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी संबंधितांना दिले आहेत.
सोमवारपासून शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या भागात येण्याची सुरुवात होणार असून, शाळा सुरू होत असल्याने या ड्रेनेज लाईन कामामुळे विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये तसेच या भागात लवकरात लवकर ड्रेनेज लाईन टाकून घ्यावेत व रस्ता लवकरात लवकर येणे जाण्यासाठी मोकळा करावा याबाबतचे सूचना माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी दिले आहेत. तसेच या ठिकाणी शालेय पोषण आहाराचे सेंटर सुरू असून तेथील ड्रेनेज चेंबरचे काम अपूर्ण राहिले आहेत तेही सोमवार पूर्वी करून घ्यावे, अशाही सूचना दिल्या. शालेय पोषण आहार योजनेचे काम या ठिकाणी सुरू असते त्याचे खरकटे रस्त्यावर येऊन दुर्गंधी वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे सेंटर बाहेर त्वरित चेंबर बांधण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली.
याबाबत माहिती देताना माजी नगरसेविका प्रियंका ताई बारसे यांनी सांगितले की, या परिसरात बन्सल सिटी लाईनीतील अनेक नागरिकांचे ड्रेनेज लाईन मुख्य चेंबरला जोडलेले नाहीत तसेच पाण्याचे नळ कनेक्शन आणि ठिकाणी तुटले आहे. ही कामे आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या लक्षात आणून देण्यात आले असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असल्याचे अभियंते जगताप यांनी सांगितले आहे.