शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवीन आधार नोंदणी संच वितरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधार नोंदणी केंद्राकरिता अर्ज मागविणेत आले होते. यासाठी 356 अर्ज प्राप्त झाले होते. यातील २७२ अर्ज पात्र ठरले.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पात्र अर्जदारांसमक्ष आधार संच वितरण सोडत १२ जून रोजी घेण्यात आली. यामध्ये एकूण ११५ पात्र अर्जदारांना नवीन आधार नोंदणी संचाची मंजूरी अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात आली.
आधार नोंदणी केंद्राकरिता ग्रामीण कार्यक्षेत्राकरिता ६५ रिक्त केंद्र जाहिर केली होती, त्यामध्ये ६२ अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करणेत आली आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये एकूण ७ रिक्त केंद्र जाहिर केली होती, त्यामध्ये ७ अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आली.
पुणे महानगर पालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण २२ रिक्त केंद्र जाहीर केली होती. त्यामध्ये २२ अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आले, तर पिंपरी चिंचवड महानगर पालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण २८ रिक्त केंद्र जाहीर केली होती. त्यामध्ये २४ अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आली आहेत.
या नवीन आधार संच वितरण सोडतीवेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपजिल्हाधिकारी तथा आधार नोडल अधिकारी श्रीमती पल्लवी घाटगे, तसेच आधार संच वितरण समिती सदस्य उपस्थित होते.