spot_img
spot_img
spot_img

ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा

  • जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पुणे जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला.

कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या प्रकरणांत संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करुन सदर कागदपत्रे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास उपलब्ध करुन द्यावेत. ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल होताच पोलीस विभागाने त्याबाबत तातडीने सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे व नागरी हक्क संरक्षण शाखा यांना अहवाल सादर करावा आणि पिडीत व्यक्तींचे जातीचे दाखले प्राप्त करून घेण्यासाठी पोलीस विभागाने संबंधित पिडीत व्यक्तींकडे पाठपुरावा करावा. सामाजिक न्याय दिना निमित्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम जनजागृती करीता कार्यशाळा आयोजित करावी, अशा सूचना समितीद्वारे देण्यात आल्या.

सदरचा आढावा अध्यक्षांच्या परवानगी ने सदस्य सचिव सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी घेतला. बैठकीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, पुणे ग्रामीणचे पोलिस उप अधीक्षक दिलीप शिंदे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य साधू बल्लाळ, संतोष कांबळे उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!