शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रायमरी शिक्षणाचा महोत्सव रुपीनगर तळवडे येथे एक आगळावेगळा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम पार पडला. गेली अनेक वर्षांपासून या शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन व लकी ड्रॉ सोहळामोठ्या दिमाखात पार पडला. सौ शितलताई धनंजय वर्णेकर यांच्या माध्यमातून रुपीनगर तळवडे सहयोग नगर परिसरातील 280 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 700 पेक्षा जास्त पालकांनी यासाठी अर्ज सादर केले होते व त्यातील लकी ड्रॉमध्ये 280 मुलांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येणार आहे.
सातत्याने समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून शिक्षण क्षेत्रामध्ये व सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या सौ शितलताई धनंजय वर्णेकर यांच्या माध्यमातून समाजातील गरजू विद्यार्थ्यापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचे कार्य केले जाते रुपीनगर तळवडे भागामध्ये भारतातील अनेक राज्यांमधून लोक स्थायिक झाले आहेत या सर्वांनाच आपल्या पाल्याला उच्च प्रतीचे शिक्षण देणे शक्य होत नाही आज खऱ्या अर्थाने शिक्षणाशिवाय एखाद्या कुटुंबाची किंवा समाजाची प्रगती होऊ शकत नाही परंतु चांगले शिक्षण सर्वांच्या करता घेणे शक्य होत नाही याचा विचार करून गेली पाच वर्षापासून सातत्याने शितलताई यांच्या माध्यमातून समाजातील अनेक मुलांना पूर्णपणे मोफत प्री प्रायमरी शिक्षण देण्याचे काम चालू आहे.विद्यार्थ्यांना यापुढील प्रायमरी शिक्षण,स्पोर्ट,व सार्वजनिक विकास याच्या करता संपूर्ण खर्च शितलताई यांच्या माध्यमातून उचलला जातो. केंब्रिज इंटरनॅशनल प्री स्कूल च्या माध्यमातून सदर शिक्षण दिले जाते.
या लकी ड्रॉच्या उद्घाटन प्रसंगी पुणे नियोजन समितीचे संचालक श्री गोपाळशेठ भालेकर, श्री एस.डी भालेकर, AB स्पोर्ट क्लब संचालक शिवाजी देवकुळे सर, मा.नगरसेवक प्रवीण शेठ भालेकर, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भाऊ भालेकर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पतंगे गुरुजी, श्री रमेश अण्णा भालेकर, सौ.अस्मिता अनिल भालेकर, स्वाती कासार, श्री संपत भालेकर, शिव व्याख्याते श्री सचिन ढोबळे, अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गजानन भाऊ वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते श्री हनुमंत कलमोरगे , सामाजिक कार्यकर्ते विलास तात्या भालेकर, विक्रम हिवरे, रहीम शेख,श्री.संदीप जाधव श्री.दादा सातपुते, स्वप्निल वाघमारे, नूर शेख,वैभव खोडवे,श्री राम भाऊ भालेकर, श्री माऊली भालेकर, श्री शरद गोपाळ भालेकर, रामदासजी कुटे, शिवसेना नेते नितीनजी बोंडे, शरद तात्या भालेकर,रवी एकशिंगे, मा.श्री विशाल मानकरी, शिवाजी बोडके, त्रिंबक मुळीक, नितीन शिंदे,रवी शेतसंधी, श्री संतोष पवार श्री संतोष पवार. तसेच मोठ्या प्रमाणात पालक व नागरिक उपस्थित होते.
आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण दिले तरच परिवाराची आर्थिक उन्नती होऊ शकते याकरता सामान्य पालकांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण हे शक्य नसते याचा विचार करून प्राथमिक शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाईल असे कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंब्रिज ग्रुप ऑफ स्कूल चे अध्यक्ष डॉ धनंजय वर्णेकर यांनी केले. सौ शितलताई धनंजय वर्णेकर हे या भागामध्ये नेहमीच सामान्य नागरिकांच्या सर्व कार्यामध्ये कार्य करीत असतात.नेहमीच समाज उपयोगी व ज्येष्ठ नागरिक महिला तरुण तसेच लहान मुले या सर्वांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.
आज सामान्य पालकांना उत्कृष्ट आदर्श शिक्षण घेणे अवघड आहे मात्र या वर्णेकर परिवारांनी ही शिक्षणाची गंगा संपूर्णपणे मोफत पणे माझी जबाबदारी या भावनेतून या भागांमध्ये गेली पाच वर्ष सातत्याने राबवली आहे.खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांचा वारसा हे दांपत्य चालवीत आहे असे उदगार श्री गोपाळ भालेकर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितले.
खऱ्या अर्थाने समाजामध्ये अनेक श्रीमंत व्यक्ती असतात परंतु आपल्याबरोबरच समाजातील इतर घटकांचा विचार करून त्यांच्या उन्नती साठी काम करणारे शितलताई या भागासाठी खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या माई आहेत असे उद्गार शिवव्याख्याते सचिन जी ढोबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले तर शिक्षण सारखे महान काम सातत्याने करणारे या जोडप्याचा आमच्या भागातील सर्वांना अभिमान आहे असे उद्गार माननीय श्री एस.डी भालेकर यांनी काढले समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही कार्य शितलताई करीत आहेत शिक्षणाबरोबर भारतीय संस्कृती जपण्याचं काम ही संस्था करत आहे हे काम करण्याचे धाडस फक्त वर्णेकर कुटुंबच करू शकते असे माननीय श्री कामगार नेते इरफान भाई सय्यद यांनी व्यक्त केले.
तर ह भ प श्री आव्हाड महाराज यांनी सांगितले तळागाळातील सर्वसामान्य व्यक्ति करता आत्मीयतेने व जिव्हाळा पूर्ण कार्य नेहमीच वर्णेकर परिवार करतात.सदर कार्यक्रमाचे निवेदन श्री अक्षय मोरे यांनी केले तर आभार बिभीषन पोकळे यांनी मानले.