spot_img
spot_img
spot_img

महानगरपालिका निवडणुकीसाठी आता इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा

रहाटणी मधील प्रभाग क्रमांक 27 मध्ये भाजपमधून तीन उमेदवार सर्वाधिक चर्चेत

भाजप युवा मोर्चाचे मा.शहराध्यक्ष राज तापकीर यांचे नाव आघाडीवर

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी,

रहाटणी: मागील तीन ते चार वर्षापासून रखडलेली महानगरपालिका निवडणूक येत्या चार महिन्यात संपन्न होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने राज्य शासनाला आदेश दिले तसेच दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून महानगरपालिकांनाही प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात चार सदस्यांचा प्रभाग कायम राहणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा व्हायला आता सुरुवात झाली आहे. तसेच इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी तयारीलाही लागले आहेत. महानगरपालिका निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवार सज्ज झाले आहेत. पक्ष कोणत्या उमेदवाराला उमेदवारी देईल हे अजून गुलदस्त्यात असतांनाही उमेदवारांच्या नावांची चर्चा जोर धरत आहे. त्यातच रहाटणी भागातील प्रभाग क्रमांक 27 मधून भारतीय जनता पक्ष मधून तीन उमेदवारांच्या नावांची चर्चा सर्वाधिक होत आहे.

रहाटणी मध्ये भारतीय जनता पक्षाचे मागील निवडणुकीत वर्चस्व राहिले आहे. आताही भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रामुख्याने तीन उमेदवारांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये सर्वात प्रथम युवा नेतृत्व म्हणून समोर आलेलं नाव राज दादा तापकीर, तसेच चंद्रकांत अण्णा नखाते व देविदास तांबे या तीन उमेदवारांच्या नावांची चर्चा सर्वाधिक होत आहे.

युवकांमध्ये लोकप्रिय असलेलं सक्षम नेतृत्व म्हणजेच राज तापकीर

भाजप युवा मोर्चाचे मा.शहराध्यक्ष राज तापकीर यांना पहिल्यापासूनच राजकीय वारसा लाभला आहे. त्यांची आई सुनिता हेमंत तापकीर या 2017 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच आपल्या प्रभागात अनेक विकास कामे करून सक्षम नगरसेविका म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्यांच्याच खांद्याला खांदा लावून राज तापकीर यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली, अनेक सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी युवकांमध्ये आपली क्रेज निर्माण केली. राज तापकीर यांचे आजोबा बाबासाहेब तापकीर हेही महानगरपालिकेचे नगरसेवक राहिले आहे. तसेच महानगरपालिकेतील स्थायी समितीचे प्रथम अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पद भूषविले आहे त्यावेळी प्रभागामध्ये विकास कामांचा झंजावात त्यांनी निर्माण केला होता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आता राज तापकीर आपली राजकीय कारकीर्द घडवित आहेत. राज तापकीर यांचे नेतृत्व गुण पक्षाने हेरले व त्यांना भाजप युवा मोर्चाचे शहरअध्यक्ष पद दिले. या पदावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत युवकांची नवीन फळी तयार केली आहे. युवकांमध्ये राज तापकीर लोकप्रिय आहेत तसेच भाजप वतीने महानगरपालिका निवडणुकीत यावेळी तरुणांना संधी देण्याचे धोरण आखले असल्याने रहाटणी प्रभागातून राज तापकीर यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. राज तापकीरही या होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या ताकदीने उतरणार असल्याची चर्चा प्रभागातील नागरिकांमध्ये होत आहे.

पक्षनिष्ठेमुळे प्रथम पसंती असणारे मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते

मागील पंधरा वर्षापासून नगरसेवक राहिलेले माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. महानगरपालिका निवडणूक लवकरच होत असल्याने चंद्रकांत नाखाते यांना परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडे नगरसेवक पदाचा मोठा अनुभव, तसेच प्रभागात केलेल्या विकास कामांमुळे सक्षम नेतृत्व व अनुभवी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते मागील विधानसभा निवडणुकीत तीव्र इच्छुक असताना पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी पक्षनिष्ठा त्यांनी राखली व पक्षाने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या उमेदवाराचे काम केले त्यामुळे पक्षनिष्ठेच्या जोरावर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या वतीने त्यांना प्रथम पसंती देण्यात येईल अशी राजकीय जाणकार सांगत आहे.

सरपंच फाउंडेशनच्या माध्यमातून चर्चेत असणारे देविदास तांबे

रहाटणी परिसरात सरपंच फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक काम करणारे देविदास तांबे यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत निवडणूक लढविण्यास तीव्र इच्छुक असलेले देविदास तांबे यांनी प्रभागात अनेक सामाजिक कामातून आपली चूणुक दाखवून दिली आहे. रहाटणी परिसरातील सोसायटी धारकांमध्ये ते जास्त लोकप्रिय आहेत. एम. एन. जी. पाईपलाईन प्रत्येक सोसायटीमध्ये पोहोचविण्याचे प्रयत्न त्यांनी केले त्यात त्यांना मोठे यश आले विधानसभेत ही त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त लीड देण्याचे प्रयत्न केले तसेच भाजप वतीने दिलेले विविध उपक्रम त्यांनी प्रभागात उत्तम प्रकारे राबविले तसेच रहाटणी परिसरातील जनतेशी त्यांची असलेली जवळीक, आमदार शंकर जगताप यांचे खंदे समर्थक असणारे देविदास तांबे यंदा निवडणूक लढविण्यास सज्ज असून पक्षाच्या वतीने त्यांनाही उमेदवारी मिळेल असे सांगण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!