अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा टेक ऑफनंतर अवघ्या पाच मिनिटांत अपघात झाला. या अपघातात २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत होती जी खरी ठरली आहे. २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. विमानाने टेक ऑफ घेताच अवघ्या काही मिनिटांत विमानाचा अपघात झाला आणि ते कोसळलं. या घटनेत सर्वच्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आता पोलिसांनी व्यक्त केली आहे.विमानात नेमके किती प्रवासी, क्रू मेंबर्स होते?अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, अशी माहिती डीजीसीएच्या निवेदनात देण्यात आली आहे. त्याशिवाय, या विमानात २ वैमानिक व १० केबिन क्रू मेंबर्स होते, असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. कॅप्टन सुमीर सभरवाल हे या विमानाचे वैमानिक होते. त्यांना ८ हजार २०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे. त्याशिवाय केबिन क्रूलादेखील ११०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे, असं एअर इंडियाने निवेदनात म्हटलं आहे.
अनेक मृतदेह जळून खाक, ओळख पटणवणं कठीणविमान अपघातामुळे मृतदेह जळून खाक झाले आहेत. अनेक मृतांची ओळख पटणं बाकी आहे. आता डीएनए टेस्टद्वारे मृतांची ओळख पटवली जाईल. मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना, कुटुंबीयांना बोलवून डीएनएद्वारे ओळख पटवली जाईल. गुजरातच्या आरोग्य सचिवांनी सांगितलं की अनेक मृतदेह असे आहेत ज्यांची ओळख पटवणं अगदीच कठीण झालं आहे. अहमदाबाद रुग्णालय, तसंच हॉस्टेल या ठिकाणी जे जखमी झाले त्यांना आम्ही रुग्णालयात आणलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.अनेक मृतदेह जळून खाक, ओळख पटणवणं कठीणविमान अपघातामुळे मृतदेह जळून खाक झाले आहेत. अनेक मृतांची ओळख पटणं बाकी आहे. आता डीएनए टेस्टद्वारे मृतांची ओळख पटवली जाईल. मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना, कुटुंबीयांना बोलवून डीएनएद्वारे ओळख पटवली जाईल. गुजरातच्या आरोग्य सचिवांनी सांगितलं की अनेक मृतदेह असे आहेत ज्यांची ओळख पटवणं अगदीच कठीण झालं आहे. अहमदाबाद रुग्णालय, तसंच हॉस्टेल या ठिकाणी जे जखमी झाले त्यांना आम्ही रुग्णालयात आणलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.