spot_img
spot_img
spot_img

वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने रवींद्र काळे यांचा सन्मान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे यांची लायन्स क्लब च्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे व पदाधिकारी यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी क्लासेस हॉल केशवनगर चिंचवड येथे पार पडला.
या सत्काराचे विशेष म्हणजे लायन्स क्लब अध्यक्ष पदी सलग दुसऱ्यांना रवींद्र काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे रवींद्र काळे हे वूई टुगेदर फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत त्यामुळे त्यांचा सत्कार करताना आम्हाला खूप आभिमान व आनंद होत आहे असे मत फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या वेळी फाउंडेशन उपाध्यक्षा सोनाली मन्हास,सचिव जयंत कुलकर्णी,
सह सचिव मंगला डोळे – सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे,सल्लागार रवींद्र सागडे,सलीम सय्यद,
दारासिंग मन्हास,क्रांतीकुमार कडुलकर ,जयंत राऊत, रवींद्र इंगळे, विलास गटने, शंकर कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, जगदीश खोडके, सौ खोडके, अनिल पोरे बाळासाहेब जगताप, अरविंद पाटील, परमानंद सोनी, खुशाल दुसाने, श्रीनिवास जोशी, दिलीप पेटकर, के रंगराव, सदाशिव गुरव, उदय कुलकर्णी, नंदकुमार वाडेकर, हनीफ सय्यद, उल्हास दाते, साधना बापट, भास्कर पाखले, रवींद्र शेटे आदी पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपाध्यक्षा सोनाली मन्हास यांनी सूत्रसंचालन केले.
खजिनदार दिलीप चक्रे यांनी उपस्तित मान्यवर व पदाधिकारी यांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!