spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत ७८ लाखांचा अमली पदार्थ जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने विशेष मोहिमेंतर्गत मे महिन्यात ७२ कारवायांमध्ये १३५ किलो गांजा, ५२१ ग्रॅम अफू, ९५ ग्रॅम एमडी असा एकूण ७८ लाख २ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यांमध्ये ८३ आरोपींवर कारवाई करण्यात आली.

पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार १ ते ३१ मे या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती. या मोहिमेत गुन्हे शाखेने सर्वाधिक ३२ कारवाया करीत ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यात बावधन, चाकण, दिघी, पिंपरी, म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत गांजासह एमडी व अफू जप्त करण्यात आले.

बावधन पोलिसांनी २१ किलो गांजा जप्त केला. चाकण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ११ व १५ किलो गांजा जप्त केला. दिघी पोलीस ठाण्याने दोन कारवायांत एकूण १३ किलो गांजा व ११ ग्रॅम एमडी हस्तगत केले. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने म्हाळुंगेत २८ किलो गांजाची झाडे पकडली. याशिवाय हिंजवडी पोलिसांनी ६८ ग्रॅम एमडी जप्त करीत दोन आरोपींना अटक केली. ही विशेष मोहीम पिंपरी-चिंचवड शहरातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!