spot_img
spot_img
spot_img

आंबेडकर भवन विस्तारीकरणासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी सकारात्मक चर्चा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मंगळवार पेठ येथील ससून हॉस्पिटल समोरील जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तार करावा, त्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्माण करावे अशी मागणी घेऊन आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय  नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.   सदर निवेदनाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सदर स्मारकाच्या जागेबाबत आपण सकारात्मक असून शासनाच्या वतीने शक्य तितक्या लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. 

मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण, राहुल डंबाळे, संजय सोनवणे यांचा समावेश होता. 

दरम्यान सदर अनुषंगाने आंबेडकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाने यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.  यावेळी फडणवीस यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यांना संपूर्ण विषय सांगितला होता त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या  स्मारकासाठी आपण सकारात्मक आहोत, मात्र काही  निर्णय यापूर्वी झाले असल्यामुळे तांत्रिक अडचण दूर झाल्याशिवाय यात निर्णय घेता येणार नाही असे त्यांनी कळवले होते. त्या अनुषंगाने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!