spot_img
spot_img
spot_img

सनदी लेखापालांसाठी ‘नवोन्मेष २०२५’, दोन दिवसीय विभागीय परिषद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दी इन्स्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल, पुणे शाखा आणि पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवोन्मेष २०२५’ या सनदी लेखापालांच्या दोन दिवसीय विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (ता. १३) व शनिवार (ता. १४) या दोन दिवशी एरंडवणे येथील सिद्धी बँक्वेटमध्ये होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १३) सकाळी ९.३० वाजता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी आयसीएआय’च्या विभागीय समितीचे सदस्य सीए रेखा धामणकर, सीए राजेश अग्रवाल, सीए अभिषेक धामणे, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए वैभव मोदी, सचिव सीए निलेश येवलेकर, सीए नेहा फडके, सीए ऋषिकेश बडवे, सीए प्रीतेश मुनोत आदी उपस्थित होते.

सीए सचिन मिणियार म्हणाले, ‘डब्ल्यूआयआरसी’चे सीए केतन सैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही विभागीय परिषद सनदी लेखापाल व्यावसायिकांसाठी करसुधारणा, वित्तीय तयारी, ऑडिट यंत्रणा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट्सना बदलत्या आर्थिक, तांत्रिक आणि कायदेशीर वातावरणाशी समरस होण्याची संधी देणार आहे. पहिल्या दिवशी सीए गिरीश आहुजा ‘भारतीय उत्पन्न कर व्यवस्थेतील बदलते परिदृश्य’, सीए अनिकेत तलाठी ‘स्टॅच्युटरी ऑडिटपासून फॉरेन्सिक ऑडिटकडे बदलत्या जबाबदाऱ्या’, सीए अर्पित जैन ‘व्यावसायिक ब्रँडिंग – प्रॅक्टिशनर ते थॉट लीडर’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. 

‘एआय ऑटोमेशन व सीए क्षेत्रातील बदल’ या विषयावरील सीए सचिन चितळांगे, सीए यश गोयंका, सीए सुप्रिया बंसल, सीए निकिता पंजाबी सहभागी होणार आहेत. चर्चासत्राचे संचालन सीए शेखर साने करणार आहेत. दुसऱ्या दिवशी अ‍ॅड. सीए अविनाश पोद्दार ‘जीएसटीतील महत्त्वाचे निर्णय व त्याचे परिणाम’, सीए मनीष बक्षी व सीए आनंद राठी ‘आयपीओ रेडिनेस व भांडवली बाजाराचे भविष्य’ व सीए ललित वलेचा ‘स्टार्टअप फिनान्सिंग: २०२५ मध्ये सीएंना आवश्यक माहिती’ या विषयावर सत्रे होणार आहेत. अधिक माहितीसाठी www.puneicai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे सीए वैभव मोदी यांनी नमूद केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!