spot_img
spot_img
spot_img

येत्या ३ ऑगस्ट रोजी नीट पीजी परीक्षा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दोनऐवजी एका सत्रात परीक्षा घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (नीट पीजी) परीक्षेची तारीख राष्ट्रीय वैद्यकीय शास्त्र परीक्षा मंडळाने (एनबीईएमएस) जाहीर केली आहे. त्यानुसार नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

पर्सेंटाईलमुळे होणारा गाेंधळ लक्षात घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी नीट पीजी परीक्षा देणाऱ्या दाेनऐवजी एका सत्रात घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एनबीईएमएसने नीट पीजी परीक्षा एकाच सत्रामध्ये घेण्याचा निर्णय घेऊन ही परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

परीक्षा एकाच सत्रामध्ये घेण्यासाठी एनबीईएमएसने परीक्षा केंद्र असलेल्या शहरांमध्ये वाढ केली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र निवडण्यासाठी शहर निवडण्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १३ जून रोजी दुपारी ३ नंतर संकेतस्थळावर पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना १७ जून रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत शहरांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी निवडलेल्या शहरातील परीक्षा केंद्राची एनबीईएमएसद्वारे वाटप करण्यात येणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!